Ad will apear here
Next
राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत रक्तदान शिबिर

कुसगाव : श्रीमती काशीबाई नवले सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्सच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एस. रोहोकले यांच्या हस्ते झाले.

 या वेळी सिंहगड लोणावळा संकुलाचे संचालक डॉ. एम. एस. गायकवाड, निवृत्ती बाबाजी नवले कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. जयवंत देसाई, स्थावर मालमत्ता अधिकारी पंकज जाधव, कार्यक्रमाधिकारी प्रा. सुहास चव्हाण, प्रा. सुमित देवर्षी आदी मान्यवर उपस्थित होते. या शिबिरांतर्गत एकूण १०६ युनिट रक्त संकलित करण्यात आले. जे श्रीमती काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील रुग्णांना मोफत देण्यात आले. 

या शिबिराच्या यशस्वीतेसाठी श्रीमती काशीबाई नवले सामान्य रुग्णालय रक्तपेढी व सिंहगड इन्स्टिट्यूटच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी विशेष प्रयत्न केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZIJBX
Similar Posts
सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये उच्चशिक्षणामधील बदलासंबंधी कार्यशाळा कुसगाव : ‘कालानुरूप उच्च शिक्षणामधील बदल’ या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची व्यवस्थापन परिषद व अधिसभेची कार्यशाळा पार पडली.
‘सिंहगड’च्या रूपाली गोंधळीचा सुवर्णवेध कुसगाव : सिंहगड इन्स्टिट्यूटच्या कुसगाव येथील एन. बी. नवले कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्सची विद्यार्थीनी रूपाली गोंधळी हिने ओरिसातील भुवनेश्वर येथे झालेल्या आंतरविद्यापीठ तिरंदाजी स्पर्धेत कंपाउंड राउंड प्रकारात सांघिक सुवर्णपदक पटकाविले.
नवले महाविद्यालयामध्ये मराठी राजभाषा दिन साजरा कुसगाव : मराठी राजभाषा दिनानिमित्त येथील एन. बी. नवले महाविद्यालयामध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ज्येष्ठ कवी सुरेश भट यांचे मराठी भाषा गौरव गीत गायिले गेले. या वेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. जयवंत देसाई यांनी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक, कविवर्य कुसुमाग्रज तथा वि
सिंहगड शिक्षण संस्थेच्या लोणावळा संकुलात राष्ट्रीय एकता दिन साजरा कुसगाव : सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त सिंहगड शिक्षण संस्थेच्या लोणावळा संकुलाच्या वतीने राष्ट्रीय एकता दिन साजरा करण्यात आला. या वेळी एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language